---Advertisement---
जळगाव जिल्हा

वारकऱ्यांनो लक्ष द्या! भुसावळमार्गे पंढरपूरसाठी विशेष गाड्या धावणार, वेळापत्रक जाणून घ्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२४ । आषाढी वारीसाठी तुम्हीही ट्रेनने पंढरपूरला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. मध्य रेल्वे पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी पंढरपूर आषाढी एकादशी’ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-मिरज, नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर विशेष गाड्या धावतील. ०११५९ भुसावळ-पंढरपूर विशेष गाडी भुसावळ येथून १६ जुलैला दुपारी दीडला सुटेल. दुसऱ्या दिवशी १७ जुलैला पहाटे साडेतीनला पंढरपूरला पोहोचेल. ०११६० विशेष गाडी पंढरपूर येथून १७ जुलैला रात्री साडेदहाला सुटेल

bhusawal pandharpur jpg webp

दुसऱ्या दिवशी १८ जुलैला दुपारी एकला भुसावळला पोहोचेल. ही गाडी जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी येथे थांबा घेईल. ०१२०५ नागपूर-मिरज स्पेशल (२ सेवा) विशेष गाडी नागपूर येथून १४ जुलैला सकाळी ८ वाजून ५० मिनिटांना सुटेल. दुसऱ्या दिवशी १५ जुलैला ११ वाजून ५५ मिनिटांनी मिरजला पोहोचेल. ०१२०६ विशेष गाडी मिरज येथून १८ जुलैला दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल.

---Advertisement---

दुसऱ्या दिवशी १९ जुलैला १२ वाजून २५ मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसाबा डोंगरगाव, जठरगाव धालगाव, कवठेमहांकाळ व सुलगरे या रेल्वेस्थानकावर ती थांबेल.

०१११९ नवी अमरावती-पंढरपूर विशेष (४ सेवा) गाडी नवी अमरावती येथून १३ व १६ जुलैला दुपारी अडीचला सुटेल. दुसऱ्या दिवशी ९ वाजून १० मिनिटांनी पंढरपूरला पोहोचेल. बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी याठिकाणी गाडीला थांबे असतील.

०११२१ खामगाव-पंढरपूर विशेष (४ सेवा) गाडी खामगाव येथून १४ व १७ जुलैला साडेअकराला सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीनला पंढरपूरला पोहोचेल. ०११२२ विशेष गाडी पंढरपूर येथून १५ व १८ जुलैला पाचला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री साडेसातला खामगावला पोहोचेल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---