जळगावमार्गे बिलासपूर-मडगाव, वलसाड दरम्यान विशेष एक्स्प्रेस धावणार, वेळापत्र अन् थांबे घ्या जाणून

डिसेंबर 22, 2025 9:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । नाताळ सुट्ट्यांच्या आणि नवीन वर्षानिमित्त रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने जळगाव आणि भुसावळ मार्गे विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने बिलासपूर-मडगाव, बिलासपूर-वलसाड मार्गावर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही मार्गावर प्रत्येकी ८ अशा एकूण १६ विशेष रेल्वे डिसेंबर ते जानेवारी दरम्यान धावतील. या गाड्यांना जळगावसह भुसावळ स्थानकांवर थांबा असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.

train

बिलासपूर-मडगाव विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस
बिलासपूर-मडगाव (०८२४१) विशेष साप्ताहिक एक्स्प्रेसच्या २० डिसेंबर ते १० जानेवारी दरम्यान आठ फेऱ्या होतील. ही रेल्वे प्रत्येक शनिवारी बिलासपूर येथून दुपारी २.४५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे २.१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी (०८२४२) २२ डिसेंबर ते १२ जानेवारी दरम्यान प्रत्येक सोमवारी मडगाव येथून पहाटे ५.३० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता बिलासपूर येथे पोहोचेल.

Advertisements

थांबे : या रेल्वेला भाटापारा, रायपूर, दुर्ग, राजनंदगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी आदी स्थानकांवर थांबा आहे.

Advertisements

बिलासपूर-वलसाड विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस
बिलासपूर-वलसाड (०८२४३) विशेष साप्ताहिक एक्स्प्रेसच्या १८ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान ८ फेऱ्या होतील. ही गाडी प्रत्येक गुरुवारी बिलासपूर येथून दुपारी ४ वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी दुपारी १.५० वाजता वलसाड येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी (०८२४४) १९ डिसेंबर ते ९ जानेवारी दरम्यान प्रत्येक शुक्रवारी वलसाड येथून सायंकाळी ४.५० वाजता सुटेल.दुसऱ्या दिवशी दुपारी १.५० वाजता बिलासपूर येथे पोहोचेल.

थांबे : या गाडीला भाटापारा, रायपूर, दुर्ग, राजनंदगाव, डोंगरगड, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, अमळनेर, नंदुरबार, चलथान आणि भेस्तान येथे थांबा आहे.

तिकिट आरक्षण सुरू
भुसावळ, जळगाव, मलकापूर या भागातील प्रवाशांना बिलासपूरसह सुरतकडे जाण्यासाठी या रेल्वेचा फायदा होईल. गाडीत वातानुकूलित, शयनयान व सामान्य श्रेणीचे डबे असतील. या गाड्यांसाठी आरक्षण सर्व आरक्षण केंद्रासह आयआरसीटीसी संकेतस्थळावर खुले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now