⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

पाच लाखाची लाच घेताना विशेष लेखापरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२३ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढतच असून अशातच एकही एक लाचखोर ACB च्या जाळ्यात अडकला आहे. पतसंस्था अवसायानात निघाल्याने सदर संस्थेच्या गाळ्याची अनामत रक्कम नगरपरिषदेच्या दप्तरी तक्रारदाराच्या नावे पत्र व्यवहार करून वर्ग करून देण्यासाठी पाच लाखाची लाच घेताना विशेष लेखापरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. सखाराम कडू ठाकरे असं लाच घेण्याचे असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

यावल तालुक्यातील श्री महालक्ष्मी सहकारी नागरी ही पतसंस्था अवसयानात निघाल्याने या संस्थेचे सावदा येथील राजे छत्रपती संभाजीराजे व्यापारी संकुल कार्यालयाच्या गाळ्याची भरलेली सुरक्षित अनामत रक्कम नगर परिषदेच्या दप्तरी तक्रारदाराच्या नावे पत्र व्यवहार करून वर्ग करून देण्यासाठी, सहकारी संस्थेचे विशेष लेखापरीक्षक सखाराम ठाकरे यांनी तक्रारदाराकडे तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाचोरा येथे जाऊन धुळे येथील सहकारी संस्थेचे विशेष लेखा परीक्षक सखाराम ठाकरे याला पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली असून, याप्रकरणी सखाराम ठाकरे यांच्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

यांनी केली कारवाई?

ही कारवाई लाचलुपत प्रतिबंधक खात्याचे निरिक्षक हेमंत बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखालील पोनि रूपाली खांडवी, पो. हवा. राजन कदम, शरद काटके, पो. शि. संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, चालक पोहवा सुधीर मोरे यांच्या पथकाने केली.