---Advertisement---
बातम्या राष्ट्रीय

अरे देवा..! दक्षिण कोरियात 181 प्रवाशी असलेलं विमान कोसळलं; अनेकांचा मृत्यू, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । अलीकडच्या याकाळात विमानांना होणाऱ्या अपघाताच्या घटना वाढताना दिसत आहे. आता याच दरम्यान, दक्षिण कोरियातून (South Korea) विमान अपघाताची मोठी दुर्घटना समोर आलीय. दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Muan International Airport) बोईंग 737-800 विमान कोसळले. ज्यामध्ये 181 जण होते. यात ६२ जण ठार झाल्याची माहिती समोर आलीय. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे Jeju Air Flight 2216

Airplan Crash

जेजू एअर (Jeju Air) कंपनीचे हे विमान बँकॉक येथून दक्षिण कोरियात परत येत होते. आज रविवारी सकाळी 9:07 वाजता, मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतेवेळी विमान धावपट्टीवरून घसरले आणि संरक्षण भिंतीला धडकले. योनहाप वृत्तसंस्थेनुसार, विमानातील लँडिंग गिअरमध्ये अडचण आल्याने हा अपघात झाला. विमानातील बहुतांश प्रवासी कोरियन होते, तर दोन प्रवासी थाई नागरिक होते. हा अपघात अचानक घडल्याने विमानतळावर एकच खळबळ उडाली.

---Advertisement---

विमान संरक्षण भिंतीला धडकल्यानंतर त्याला आग लागली, ज्यामुळे आकाशात धूराचे लोट पसरले. विमानतळावर तातडीने आपत्कालीन यंत्रणा सक्रिय झाल्या आणि आग विझवण्याचे आणि प्रवाशांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. 80 अग्निशमन दलाचे जवान या ऑपरेशनमध्ये सहभागी होते.

मृतांची संख्या वाढण्याची भीती
या अपघातात कमीत कमी 62 जण ठार झाले आहेत. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातआहे. दरम्यान या सर्व अपघाताचे व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात विमानाला आग लागल्याचे आणि धूर निघत असल्याचे दिसते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---