---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या महाराष्ट्र

जळगावकरांसाठी खुशखबर ! पुणे, मुंबईसाठी लवकरच ‘वंदे भारत’ सेवा, असे असणार वेळापत्रक?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२५ । वेगवान प्रवास आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेली ‘वंदे भारत ट्रेन'(Vande Bharat Train) देशात प्रवाशांच्या पसंतीला उतरली आहे. देशात या ट्रेनला प्रवाशांकडून चांगला प्रतिसादही मिळताना दिसत आहे. मात्र अद्यापही जळगाव(Jalgaon), भुसावळ (Bhusawal) मार्गे वंदे भारत एक्सप्रेस धावत नसून जळगावकर या ट्रेनच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच ‘वंदे ‘भारत ट्रेन’ची सेवा लवकरच जळगावकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.

JL Vande Bharat

होय अमरावती- मुंबई (Amaravati Pune) आणि अमरावती-पुणे (Amaravati Pune) या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सेवा पुरविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दिल्यानंतर जळगावकरांना अवघ्या ५ ते ७ तासांतच मुंबई, पुण्याचा प्रवास पूर्ण करता येणार आहे. मुंबई आणि पुण्यासाठी ही रेल्वेगाडी भुसावळ आणि जळगावात थांबा घेणार आहे.

---Advertisement---

खरंतर देशासह महाराष्ट्रातील काही मार्गांवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र अद्यापही भुसावळ मार्गे वंदे भारत ट्रेनची सुविधा चालू नसल्याने जळगावकर या ट्रेनच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच अमरावती- मुंबई आणि अमरावती-पुणे या मार्गावर या रेल्वेगाडीची सेवा पुरविण्यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.त्यादृष्टीने भुसावळ विभागानेही या रेल्वेगाड्यांच्या वेळा व थांबे निश्चीत केले आहेत. त्यानुसार एकत्रित प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. केंद्रीय पातळीवरून मंजुरी मिळाल्यानंतर जळगाव आणि भुसावळ रेल्वेस्थानकांवरून प्रवाशांना पुणे, मुंबईकडे रवाना होता येणार आहे.

असे आहेत प्रस्तावित वेळापत्रक?
अमरावती ते मुंबई
थांबे : अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक
अमरावतीहून गाडी सुटण्याची वेळ : पहाटे ०३:४०
मुंबईला गाडी पोहोचण्याची वेळ : सकाळी ११:१०
गाडी परतण्याची वेळ : दुपारी १५:५५
गाडी पोहोचण्याची वेळ : रात्री २३:२५

अमरावती ते पुणे
थांबे :
अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, दौंड
अमरावतीहून गाडी सुटण्याची वेळ : पहाटे ४:२०
पुण्याला गाडी पोहोचण्याची वेळ : दुपारी १२:२५
गाडी परतण्याची वेळ : दुपारी १५.४०
गाडी पोहोचण्याची वेळ : रात्री २३:४५

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---