---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

दारूसाठी मुलाने जन्मदात्या पित्याची केली हत्या; जामनेर तालुक्यातील घटना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२४ । दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने जन्मदात्या बापाची धारदार चाकूने मानेवर वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना जामनेर तालुक्यातील पळसखेडा बुद्रूक येथे घडली आहे. बाजीराव पवार (वय ५८) असे या घटनेत मृत झालेल्या बापाचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

palaskheda jpg webp

पळसखेडा बुद्रूक येथील वसंत लीला नगर मध्ये राहणारे बाजीराव पवार हे वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होते. गाडी घेऊन ते बंगळूर येथे जाणार असल्याने ते जेवणासाठी घरी आले. ते निघणार यापूर्वीच सायंकाळी त्यांचा तरुण मुलगा सुमीत हा दारूच्या नशेत घरी आला. यावेळी त्याने दारू पिण्यासाठी वडिलांकडे पैशांची मागणी करू लागला. मात्र वडीलांनी पैसे देण्यास नकार दिला असता सुमितने खिशातून चाकू काढून धारदार शस्त्राने वडिलांच्या मानेवर वार केले.

---Advertisement---

मुलाने शस्त्राने वार केल्यानंतर बाजीराव पवार हे जखमी अवस्थेतच घराबाहेर पडत झाडाखाली बसले. तेथेच चक्कर येऊन खाली कोसळले. यावेळी गावातील नागरिकांनी उचलून उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे आणत असतानाच बाजीराव यांचा मृत्यू झाला. दरम्यान सुमितच्या त्रासाला कंटाळून त्याची आई व बहीणही बाहेरगावी निघून गेले होते. आठवडाभरातील जामनेर तालुक्यातील ही दुसरी घटना असून, १२ मेस मुलानेच पैशासाठी आईचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---