⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत स्नेहल माळीने पटकाविले सुवर्णपदक

राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत स्नेहल माळीने पटकाविले सुवर्णपदक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । अमळनेर येथील स्नेहल माळी हिने हरियाणा राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकाविले आहे. याबाबत सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

सध्या हरियाणा राज्यात २६ वी राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहे. यात देशभरातील प्रत्येक राज्याचे विजेते सहभागी झाले आहेत. तर महाराष्ट्र राज्याच्या वतीने नवी मुंबई येथील स्नेहल शत्रुघ्न माळी हे सबज्युनिअर गटातील ३० किमी अंतरासाठी सहभागी झाल्या. परंतु, अत्यंत अटीतटीच्या स्पर्धेत मागील रेकॉर्ड ब्रेक करून पहिला क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकाविले आहे. याबाबत सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

दरम्यान, स्नेहल हि मूळ अमळनेरची आहे. हल्ली नवी मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्या पोलीस निरीक्षक असलेल्या शत्रुघ्न माळी यांची कन्या आहे. विशेष बाब म्हणजे स्नेहलच्या निमित्ताने महाराष्ट्राला पहिल्यांदाच हे पदक मिळाले आहे. या स्पर्धेत देशभरातून ४२ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात अनेक स्पर्धक राष्ट्रीय व राज्यस्तरीय विजेते होते. स्नेहलला सोनी स्पिंग क्लबचे आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट राजेंद्र सोनी यांचे मार्गदर्शन लाभले. आगामी काळात स्नेहल भारताकडुन आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलिंग स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्नेहलने गतवर्षी २५ वी राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत कास्य पदक मिळवले होते.

यांनी केले कौतुक 

तिच्या यशाबद्दल नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग, आमदार मंदाताई म्हात्रे ,आमदार प्रशांत ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेल महापौर डाॅ. कविता चौतमोल व महाराष्ट्र सायकलिंगचे अध्यक्ष प्रताप जाधव व अमळनेर येथील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.