---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या राजकारण

..हा विकासाचा विजय ; स्मिताताई वाघ यांची पहिली प्रतिक्रिया

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२४ । लोकसभा निवकणुकीसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल जाहीर झाला असून यात जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ मोठ्या मताधिक्क्यांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांना पराभवाची धूळ चारली आहे. दरम्यान, विजय मिळविल्यानांतर स्मिताताई वाघ यांनी प्रतिक्रिया दिली.

smita vagh2 jpg webp

लोकसभेसाठी तिकीट जाहीर झाल्यापासून हि निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्ष केलेला विकास आम्ही जनतेपर्यंत घेऊन गेलो होतो. यामुळे नक्कीच हा विकासाचा विजय असल्याचे मत स्मिता वाघ यांनी बोलताना दिली आहे. या विजयानंतर स्मिता वाघ यांनी माध्यमांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे.

---Advertisement---

स्मिता वाघ यांनी सांगितले कि विरोधकांनी त्यांच्या पद्धतीने काम केले, आम्ही आमच्या पद्धतीने काम केले. कामावर श्रद्धा ठेवली. सर्व नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली असून मतदारांनी जो विश्वास दाखविला त्याबद्दल आभार. तसेच आता जळगाव जिल्ह्यातील सिंचनाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा माझा मानस राहील. कारण शेतकरी राजा खुश झाला तर जनता खुश होईल. तसेच नवीन उद्योग आणण्यासाठी आगामी काळात काम करणार असल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---