⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

स्मिताताई वाघ अन् रक्षा खडसेंकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२४ । महायुतीच्या जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार स्मिताताई वाघ व रक्षा खडसे यांनी पहिला उमेदवारी अर्ज आज दुपारी दाखल केला.

दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव मध्ये आज महायुतीकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यायला काही काळ उशीर असल्याने गैरसोय टाळण्यासाठी दोन्हीही उमेदवारांनी आपला पहिला उमेदवारी अर्ज हा दाखल केला आहे.