जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२४ । तुम्हीही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकत्याच सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात स्मार्टफोनवरील सीमा शुल्कात, आयात शुल्कात कपतीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आता स्मार्टफोन आधीच्या किमतीपेक्षा स्वस्त मिळणार आहे. यामुळे मोबाईल खरेदी करु इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काल २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत २०२४-२५ या वर्षाचा बजेट सादर केला. यात स्मार्टफोनवरील सीमा शुल्कात कपात करण्यात आल्याची घोषणा केली. मूळ सीमा शुल्क २० टक्क्यांहून आता १५ टक्के इतके कमी करण्यात आले आहे. म्हणजेच आता मोबाईल व चार्जरच्या खरेदीवर ५ टक्के प्रमाणे सूट मिळणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मोबाईल घेणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मोबाईलच्या किंमती कमी होतील.
आता किती रुपयांनी स्वस्त मिळणार स्मार्टफोन?
म्हणजेच उदाहरण देऊन सांगायचं झाल्यास, जर तुम्ही २० हजार रुपयांचा स्मार्टफोन खरेदी केला. तर, यापूर्वी २० हजार रुपयांच्या मोबाईलवर २० टक्के कस्टम ड्युटी लावली जात होती. याचा अर्थ २० हजार रुपयांच्या फोनवर ४ हजार रुपये ड्युटी चार्च ग्राहकांना द्यावा लागत होता. त्यामुळे, २० हजारांचा फोन तुम्हाला २४,००० रुपयांना विकत घ्यावा लागत होता. दरम्यान, आता सरकारने ५ टक्के कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे २० हजार रुपयांच्या मोबाईल खरेदीवर तुम्हाला ५ टक्के सवलत मिळणार आहे. म्हणजेच, २० हजार रुपये किमतीच्या मोबाईलवर आता १५ टक्केच कस्टम ड्युटी द्यावी लागेल. याचा अर्थ, ३००० रुपये कस्टम ड्युटी म्हणजेच २३००० हजार रुपये तुम्हाला द्यावे लागणार आहे. त्यामुळे, २० हजार रुपयांच्या स्मार्टफोन खरेदीवर तुमचे १००० रुपये बचत होतील. तर, तुम्ही १० हजार रुपयांचा मोबाईल खरेदी कराल, तर तुम्हाला ५०० रुपयांचा लाभ होणार आहे.