---Advertisement---
हवामान

स्कायमेटच्या नवीन अंदाजाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर ; पावसाबाबत वर्तविला ‘हा’ अंदाज..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२३ । देशात यंदा आठ दिवस म्हणजेच 8 जून रोजी मान्सून केरळात दाखल झाला. त्यांनतर तो अवघ्या तीन दिवसात महाराष्ट्रात दाखल झाला होता. यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु मान्सून दाखल झाला असला तरी पावसाचे अद्यापही जोरदार हजेरी लागली नाही. शेतकरी आज, उद्या मान्सून जोरदार हजेरी लावेल याची प्रतीक्षा करत आहे.

rain 5 jpg webp webp

मात्र अशातच स्कायमेट या खासगी हवामान संस्थेनं मान्सून बाबत महत्त्वाची आपडेट दिली आहे. येत्या चार आठवड्यात देशात पावसाचं प्रमाण कमी राहील असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे.

---Advertisement---

स्कायमेटने म्हटलं आहे की, देशात पुढील चार आठवड्यापर्यंत म्हणजेच 6 जुलै पर्यंत कमी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जून हा पेरणीपूर्ण कामे आणि पेरणीचा महिना आहे. याच महिन्यात कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्याची काळजी वाढणार आहे. पाऊस वेळेवर व पुरेसा न पडल्यास पेरणीला उशिर होऊ शकतो.

मान्सूनला केरळमध्ये पोहोचण्यासाठी यावर्षी एक आठवडा उशिर झाला आहे. त्यातच आता बिपरजॉय चक्रिवादळामुळे मान्सूनची गती मंदावली आहे. महाराष्ट्रात रविवारी तळ कोकणात मान्सून दाखल झाला. मात्र बिपरजॉय वादळामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. बिपरजॉय चक्रिवादळामुळे मान्सूनची गती मंदावली असून, जसा जसा चक्रीवादळाचा प्रभाव कमी होईल तसा-तसा मान्सून राज्यभरात सक्रीय होईल असं भारतीय हवामान खात्यानं मंगळवारी म्हटलं होतं.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---