⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | गुन्हे | अमळनेर तालुक्यातील सहा जणांना राजस्थानमधील भीषण अपघातात मृत्यू

अमळनेर तालुक्यातील सहा जणांना राजस्थानमधील भीषण अपघातात मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२३ । राजस्थान येथे फिरायला गेलेल्या अमळनेर तालुक्यातील सहा जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज १३ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. ऐन दिवाळीत झालेल्या या भीषण अपघातामुळे तालुका शोकमग्न झाला आहे.

नेमकी घटना काय?
अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील दोन शिक्षकांचे कुटुंब दिवाळीच्या सुटीनिमित्त राजस्थान मधील जैसलमेर येथे कार (क्रमांक एम एच ०४ ,९११४)ने राजस्थान फिरायला जात होते. मात्र कारने बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ एका कंटेनरला धडक दिली. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका महिलेचे उपचार घेत असतांना मृत्यू झाला.

या अपघात मांडळ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक धनराज सोनवणे( वय ५१) व त्यांची पाच वर्षाची मुलगी स्वरांजली यांच्यासह गायत्री योगेश साळुंखे (वय ३०) त्यांचा सात वर्षाचा मुलगा प्रशांत योगेश साळुंखे व एक वर्षाची मुलगी भाग्यलक्ष्मी योगेश साळुंखे असे पाच जण जागीच मयत झाले आहेत. तर धनराज सोनवणे सर यांची पत्नी सुरेखा सोनवणे ह्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ही वार्ता येताच परिसरावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, मंत्री अनिल पाटील व माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मदतीसाठी तातडीने हालचाली करून तेथील जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांशी बोलणे केल्याचे वृत्त आहे. ऐन दिवाळीत झालेल्या या भीषण अपघातामुळे तालुका शोकमग्न झाला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.