---Advertisement---
गुन्हे

सीहोरहून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात, जिल्ह्यातील २ महिला ठार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२३ । मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यात असलेल्या कुबेरेश्वर धाम महोत्सवात मोफत रुद्राक्षाचे वाटप करत आहेत. मात्र या महोत्सवादरम्यान, अनियंत्रित गर्दी पाहता रुद्राक्ष वाटप बंद करण्यात आले आहे. त्यामुळे भाविक खालीहात घरी परतत आहे. याचदरम्यान, महोत्सवातून परत येत असतांना जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाच्या झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. शोभाबाई लुकडू पाटील (वय-५२), कमलबाई आत्माराम पाटील (वय-५५) असे मृत महिलांचे नावं समोर आले आहे.

mp accident jpg webp webp

कुबेरेश्वर धाम महोत्सवात रुद्राक्ष प्राप्त करण्याच्या इच्छेने देशाच्या विविध भागातून 10 लाखांहून अधिक नागरिक यावेळी कुबेरेश्वर धाममध्ये पोहोचले आहेत. मोठ्या प्रमाणात लोकांच्या आगमनामुळे येथील परिस्थिती अनियंत्रित झाली आहे. गर्दी पाहता रुद्राक्ष वाटप बंद करण्यात आले आहे. मात्र यादरम्यान, घरी परत येत असताना मध्यप्रदेशातील जुलवानानिया गावाजवळ (एमएच १९ डीव्ही ६७८३) या गाडीची भिषण अपघात घडली.

---Advertisement---

मात्र या अपघातात अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील शोभाबाई पाटील आणि कमलबाई पाटील या दोन्ही महिला जागीच ठार झाल्या. तर इतर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

जखमी झालेल्या इतर भाविकांना शिरपूर येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. रूद्राक्ष महोत्सवात अमळनेर शहरातील खटाबाई नेरकर नावाच्या महिला हरवल्या आहेत असे देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---