---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगावातील कालिकामाता चौकात अखेर सिग्नल यंत्रणा सुरू; पण..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील कालिकामाता चौकात अखेर सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारक आपल्या मर्जीने वाहने चालवताना दिसून येतात.

kalinka mata chauk

खरंतर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कालिकामाता चौकात वाळू वाहतूक करणाऱ्या एका डंपरखाली येऊन बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती यांनतर या ठिकाणी सुरेक्षेच्या दृष्टीने सिग्नल यंत्रणेची मागणी करण्यात येत होती.अखेर या ठिकाणी सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.

---Advertisement---

सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतरही वाहतूक नियम धाब्यावर ठेवत चौफुलीवर बेशिस्त वाहनधारकांमुळे इतरांचा जीव धोक्यात येत आहे. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होत असतानाही जळगाव कडून भुसावळ कडे किंवा जुन्या जळगाव कडे जाताना मंदिरासमोर असलेल्या व्यवसायिक व प्रवासी यांच्यामुळे वाहनधारकात संभाव्य अपघात होऊ शकतो तर लहान वाहनधारक नियम धाब्यावर ठेवून आपल्या सोयीने रस्ता क्रॉस करताना दिसून येतात. सिग्नल यंत्रणा लागली मात्र या ठिकाणी पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारक आपल्या मर्जीने वाहने चालवताना दिसून येतात.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment