⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | अमळनेरात किरकोळ वादातून हवेत गोळीबार

अमळनेरात किरकोळ वादातून हवेत गोळीबार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । अमळनेर शहरातील इस्लामपुरा भागात किरकोळ वादातून एकाने हवेत दोन राऊंड फायर केल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी एका गटातील संशयीतांविरोधात भादंवि 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील इस्लामपुरा भागात दोन जणात काहीतरी वाद झाल्याने एकाने हवेत दोन राऊंड फायर केल्याची माहिती शहरात वार्‍यासारखी पसरली तर या प्रकारात एकावर हल्ला करण्यात आल्याचीदेखील चर्चा आहे.

अधिकार्‍यांची घटनास्थळी धाव
अमळनेरचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील, मिलिंद भामरे, शरद पाटील, रवी पाटील, दीपक माळी यांनी धाव घेतली. दरम्यान, एका गटाविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.