⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगावातील बळीराम पेठमधील चपला-बुटांचे दुकान फोडले ; २४ हजाराचा ऐवज लांबवला

जळगावातील बळीराम पेठमधील चपला-बुटांचे दुकान फोडले ; २४ हजाराचा ऐवज लांबवला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । जळगाव शहरातील पत्रकार भवना शेजारी असलेल्या जे. पी. शुजचे शोरूमचे सर्व कुलूप तोडून ५ ते ६ चोरट्यांनी २४ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडलीय.

बळीराम पेठेमधील पत्रकार भवन शेजारी जे. पी. शुजचे शोरूम आहे. या  ५ ते ६ चोरट्यांनी शोरूम शटरचे सर्व कुलुप तोडून आता प्रवेश केला. तसेच बाहेर लावलेले सी.सी.टीव्ही कॅमेऱ्यांचे वायरी तोडून दुकानातील रोक रक्कम 24000 रु घेऊन पोबारा केला आहे. चोरी झाल्याची घटना कळताच दुकान मालकांनी शहर पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवाली असून आज सकाळी (सोमवारी) श्वान पथक घेऊन पहानी करुण रेल्वे मार्ग पर्यंत मार्ग काढला.  पुढील तापस शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी करित आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.