⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

काँग्रेसला धक्का : बाळासाहेब थोरातांनी दिला राजीनामा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२३ । महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे बडेनेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे हा काँग्रेसला मोठा धक्का समाजाला जात आहे.

दुसरीकडे या राजीनाम्यावर आता दिल्लीत बसलेले काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र आमच्याकडे बाळासाहेब थोरात यांचा कुठलाही राजीनामा आलेला नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी नाना पटोले म्हणाले कि, बाळासाहेब थोरात आमच्याशी बोलतच नाही. कारण त्यांची प्रकृती चांगली नाहीए. नाशिक पदवीधर मतदारसंघात झालेल्या निविडणुकीवेळी मोठ राजकारण पाहायला मिळालेहोते . त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठं राजकारण रंगलं आहे.

पक्ष आणि तांबे कुटुंबात समन्वय घवडून आणण्यात अपयश आल्यामुळे थोरात यांचं विधिमंडळ पक्षनेते पद अडचणीत होतं. पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीनंतर त्यांच्याकडे पक्षनेते पद ठेवयाचं का यावर निर्णय होणार होता. पण त्यापूर्वीच बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे.