---Advertisement---
राजकारण

गिरीश महाजनांच्या ‘त्या’ टीकेला गुलाबराव पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले…

gulabrao patil girish mahajan
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२१ । हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून भाजपचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर टीका केली होती. महाजनांच्या या टीकेला शिवसेना नेते पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे.  ज्यावेळी बाबरी मशिदीचा ढाचा ढासळल्यानतंर भाजपच्या नेत्यांनी बाबरीचा ढाचा पाडल्याचे तेव्हा का कबूल केले नाही?, गिरीश महाजन यांनी याचे उत्तर देवून हिंदुत्त्व सिद्ध केल्यानतंरच या विषयावर बोलावे, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी महाजन यांच्यावर टोला लगावला आहे.

gulabrao patil girish mahajan

मंत्री गुलाबराव पाटील जळगावात होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, भाजपच्या ७२ नेत्यांनी तेव्हा बाबरीचा ढाचा आम्ही पाडला, हे का कबूल केले नाही ? त्यावेळी पाय नाही हात आहे, हात नाही पाय आहे असे सांगणारार एकच बाप होता तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे. याबाबत गिरीश महाजन यांनी बोलावे असे आव्हान गुलाबराव पाटील दिले.

---Advertisement---

काय म्हणाले होते गिरीश महाजन?

 

गिरीश महाजन यांनी जळगावात असताना राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका केली होती. ‘शिवसेना आपल्या मूळ तत्वांपासून बाजूला जाऊन अशी भरकटेल, असा आम्ही स्वप्नात देखील विचार केला नव्हता. काँग्रेस व एमआयएमच्या पुढे जाऊन शिवसेनेने हिंदुत्व विरोधी काम करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेची इतकी अधोगती कधीही झाली नाही, ती आज बघत आहोत’, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी टीकास्त्र डागले होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---