जळगाव जिल्हाबातम्याराजकारण

जळगावात मोठा गेम! 1 फेब्रुवारीला ठाकरे गटाला पडणार मोठं खिंडार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२५ । विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के सुरू असून दुसरीकडे शिंदे गटात होणारी इनकमिंग (Incoming) सुरूच आहे. अशातच आता जळगावमध्ये (Jalgaon) शिंदे गट ठाकरे गटाला (Thackeray group) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. जळगावात ठाकरे गटातील नाराजांना सोबत घेण्याच्या हालचाली सुरू असून जळगाव महापालिकेचे (Jalgaon mahanagarpalika) ठाकरे गटातील माजी नगरसेवक(Councilor) शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही महिन्यात ठाकरे गटातील अनेक नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात प्रवेश केला आहे. आता जळगाव महापालिकेतील ठाकरे गटाचे चार ते पाच माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगाव दौऱ्यात हे नगरसेवक शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 1 फेब्रुवारीला जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात मनपातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक लढलेले तसेच ठाकरे गटाचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या सुद्धा नावाची चर्चा होत आहे. एकीकडे राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याचे संकेत मिळत आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे की, “आमच्यावर लागलेला गद्दारीचा डाग जनतेने पुसून टाकलेला असून, येथे तर शिवसेनेचा भगवा चालेल.” जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका तसेच पंचायत समितीवर भगवा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button