---Advertisement---
जळगाव शहर

शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीच्या नेत्र तपासणी शिबिरात २१० लोकांनी घेतला लाभ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१ । शहरातील पिंप्राळा हुडको येथे शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीतर्फे स्वतंत्र दिनानिमित्त आयोजि मोफत नेत्र तपासणी शिबिराचा २१० लोकांनी लाभ घेतला.

IMG 20210816 WA0073 jpg webp

हेरंब नेत्रालयचे डॉ.प्रवीण पाटील यांनी अत्यावश्यक शस्त्रक्रियेची गरज असलेल्या लोकांना सूट देऊन शस्त्रक्रिया करण्यासाठी तारीख देण्यात आलेले आहे. तसेच शिवसेना अल्पसंख्यांक महानगरप्रमुख जाकिर पठाण यांनी आवश्यकता असलेल्या लोकांना मोफत चष्मे वाटप केले. कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक सुरेश सोनवणे, नगरसेवक प्रशांत नाईक, गणेश गायकवाड, अतुल बारी, महिला आघाडीचे शोभा चौधरी, सरिता माळी, नीता सांगोरे, नीलू इंगळे, मंगला बारी, मनिषा पाटील, शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीचे वसीम खान, इक्बाल शेख, जब्बार शेख, अशपाक बागवान, इक्बाल शेख, शोएब खाटीक, जमिल नागोरी, अशपाक शाह, शिवसैनिक विराज कावडिया, अमित जगताप आदी उपस्थित होते.

---Advertisement---

 

व्हिडीओ पहा :

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/353905286432534/

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---