---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या महाराष्ट्र राजकारण

गुलाबराव पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२४ । खान्देश मुलुख मैदान तोफ शिवसेना जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता गुलाबराव पाटील यांना कोणतं खातं मिळणार हे गुलदस्त्यात आहे.

GPn 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होत असून नागपूर येथे शपथविधी सोहळा सुरु आहे. या शपथविधी सोहळ्यात तब्बल 39 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन देत असून यादरम्यान शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

---Advertisement---

गुलाबराव पाटील हे पाचव्यांदा जळगाव ग्रामीणमधून आमदार म्हणून निवडून आले आहे. मागील सरकारमध्ये ते पाणीपुरवठा मंत्री होते. आता गुलाबराव पाटील यांना कोणतं खातं मिळणार हे गुलदस्त्यात आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---