जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२१ । बोदवड नगरपंचायत निवडणुकीत सर्वाधिक नऊ जागा जिंकत शिवसेनेने बाजी मारली आहे. दरम्यान, बोदवडकरांना परिवर्तन हवे असल्याने शिवसेनेनला मतदारांनी कौल दिला असल्याचे स्पष्ट मत आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
आज शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची राज्यस्तरीय ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलत होते. तसेच बोदवड नगरपंचायत निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच आ. चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिलीय.
यावेळी ‘शिवसेना पक्ष हा स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. आम्ही गुपचूप काही करत नाही, जे करतो ते समोर करतो, असा खोचक टोलाही शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंवर (Eknath Khadse) यांना हाणला आहे.
बोदवडकरांच्या कौलामुळे नगरपंचायतमध्ये शिवसेनेला बहुमत मिळाले असून सर्व मतदारांचे आभार आ. चंद्रकांत पाटील यांनी मानले. बोदवडमधील मूलभूत गरजासह शहरातील पाण्याच्या प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडविणार असल्याचे यावेळी आ. पाटील म्हणाले.
बोदवडक नगरपंचायत निवडणूक चुरशीची झाली. शिवसेनेचे ९ उमेदवार निवडून आले याचा बोदवडकरांना परिवर्तन हवे असल्याने शिवसेनेनला मतदारांनी कौल दिला असल्याचे स्पष्ट मत आ. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असो की विरोधी पक्ष असलेला भाजप असो, या सर्वांच्या विरोधात शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी १७ उमेदवार रिंगणात उभे केले होते. शिवसेनेची एक पद्धत आहे. आम्ही काहीच गुपचूप करत नाही. आम्ही जे करतो ते सर्वांच्या समोर करतो, खुलेआम करतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजप व शिवसेनेची छुपी युतीचा आरोप फेटाळला
बोदवड नगरपंचायतीच्या निकालानंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी या निवडणुकीत भाजप व शिवसेनेची छुपी युती असल्याचा आरोप केला होता. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
हे देखील वाचा :
- जळगाव शहरातील हॉटेलमध्येच सुरु होता कुंटणखाना; पोलिसांनी छापा टाकताच..
- समाजाशी नाळ जोडून ठेवणे आपले कर्तव्य : आमदार राजूमामा भोळे
- कधीकाळी होता 100 रुपये पगार, आता.. अयोध्या राम मंदिरातील मुख्य पुजाऱ्याला मिळतोय ‘इतका’ पगार?
- खातेवाटपनंतर मंत्री गुलाबराव पाटीलांची पहिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाले..
- चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक समोर; भारत-पाकिस्तान सामना ‘या’ दिवशी रंगणार?