---Advertisement---
जळगाव शहर राजकारण

शाहूनगरात शिवसेनेच्या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्तपणे सुरुवात!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२२ । शहरात शिवसेनेच्या शाखा उघडणे, निष्ठा पत्र भरून घेण्याचे कार्य जोरात सुरु असून रविवारी शाहूनगर परिसरात जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली. परिसरातील नागरिक, विशेषतः तरुणांनी सदस्य नोंदणीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

shivsena member registration

राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यभर शिवसेनेकडून पक्षबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत शाखा उदघाटनाला उपस्थिती देत असून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे राज्यभर निष्ठा यात्रेवर निघाले आहेत. स्थानिक पातळीवर जिल्हा संपर्क प्रमुख किल्ला लढवीत असून स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना जोडून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

---Advertisement---

जळगाव शहरात शिवसेना महानगरतर्फे नवीन शाखा उघडण्यासह अधिकाअधिक निष्ठा पत्र भरून घेण्यावर भर दिला जात आहे. रविवारी शाहूनगर परिसरात जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या हस्ते शिवसेना सदस्य नोंदणीला सुरुवात करण्यात आली. प्रसंगी अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जाकीर पठाण, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, वसीम खान, जिलानी शेख, गणेश गायकवाड, जमीर नागोरी, पूनम राजपूत, आसिफ पटेल, मतीन सैय्यद आदी उपस्थित होते.

सदस्य नोंदणीसाठी शोएब खाटीक, शोएब मिर्झा, अशपाक बागवान, फिरोज खान, अझहर शेख, अजीम मंसूरी, अरबाज खान, जावेद मिर्झा, शाहिद खान, मंजूर खाटीक, सादिक खाटीक, समाधान पाटील, फरहान भिस्ती, सलमान अंसारी, हाफिज जुनेद, हनीफ शेख, अख्तर भिस्ती आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शिवसेनेशी जुळणाऱ्या नवीन सदस्यांना जोरदार जल्लोष करीत घोषणाबाजी केली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---