राजकारण

अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२२ । मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेनं दणदणीत विजयाकडे वाटचाल केली आहे. ऋतुजा लटके यांनी विक्रमी आघाडी घेतली असून विजय निश्चित मानला जात आहे. ऋतुजा लटके या 11 व्या फेरीमध्ये 42343 मत घेऊन आघाडीवर आहे.

राज्यात कधी नव्हे ते पहिल्यांदाच एखाद्या पोटनिवडणुकीत राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले. शिवसेनेमध्ये बंडखोरी केल्यामुळे मोठी वाताहात झाली होती. त्यातच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप व शिंदे गट आमनेसामने आले होते. पण, अंधेरीतील वारे पाहता भाजपने माघार घेतली. नव्या चिन्हासह पहिल्याच निवडणुकीमध्ये शिवसेनेनं दणदणीत विजयाकडे वाटचाल केली आहे.

आतापर्यंत एकूण 11 फेरींचा निकाल हाती आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी मोठी आघाडी घेतली आहे. पण, दुसरीकडे इतर उमेदवारांपेक्षा नोटाला जास्त लोकांनी पसंती दिली आहे. ऋतुजा लटके या 11 व्या फेरीमध्ये 42343 मत घेऊन आघाडीवर आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल –

अकराव्या फेरीअंती एकूण मतमोजणी
ऋतुजा लटके -42343
बाळा नाडार -1052
मनोज नाईक – 622
मीना खेडेकर – 948
फरहान सय्यद – 753
मिलिंद कांबळे – 455
राजेश त्रिपाठी – 1067
नोटा – 8379
एकूण मतमोजणी – 55619

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button