जळगाव लाईव्ह न्यूज । सावदा येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ’पक्ष्यांसाठी निवारा’ अभियान राबवण्यात आले. या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटे तयार केली आणि ती शाळेच्या परिसरात बसवली.

याशिवाय पक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली.या मोहिमेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत करणे आणि उन्हाळ्याच्या काळात पक्ष्यांना आश्रय देण्याचे महत्त्व समजावून सांगणे हा होता. यावेळी विद्यार्थ्यांना अंगणात आणि गॅलरीत पाणी ठेवणे, कृत्रिम घरटे बसवून पक्ष्यांना सुरक्षित जागा देणे अशा उपयुक्त सूचनाही देण्यात आल्या.
शाळेच्या प्रिन्सीपल भारती महाजन यांनी यावेळी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करतांना उन्हाळयात माणसाप्रमाणे पशू पक्षी यांनाही संरक्षणाची गरज असते या उपक्रमातून त्यांच्यावर प्रेम करण्याची शिकवण आपणास मिळाली असेल अशी अपेक्षा व्यक्त केली. यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचा—यांनी परिश्रम घेतले.