---Advertisement---
वाणिज्य

अदानींसाठी खुशखबर.. 2 तासात कमावले 3,94,76,40,00,000 कोटी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२३ । गेल्या काही दिवसात हिडेनबर्गच्या नकारात्मक अहवालानंतर अदानी शेअर्समध्ये जोरदार पडझड झालेली दिसून आली. ज्यामुळे जगातील तिसरे अतिश्रीमंत गौतम अदानी (Gautam Adani) श्रीमंतांच्या टॉप-३० यादीतूनही बाहेर फेकले गेले. मात्र संकटात सापडलेला अदानी समूह आता हळूहळू सावरत आहे. अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स पुन्हा एकदा वेगाने व्यवहारात करताना दिसत आहे.

gautam adani jpg webp webp

बाजाराच्या शेवटच्या दिवसाच्या बाजार सत्रात म्हणजे आज शुक्रवारी गौतम अदानी फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या निर्देशांकात सर्वाधिक संपत्ती कमावणाऱ्यांच्या यादीत अव्वल ठरले. विशेष म्हणजे यापूर्वी २ मार्च रोजी देखील अदानी टॉप गेनर ठरले होते. तर आज त्यांनी बाजाराच्या सुरुवातीला फक्त दोन तासांत $४.८ अब्ज म्हणजेच सुमारे ३,९४,७६,४०,००,०० रुपये कमावले आहेत.

---Advertisement---

अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास परत येत असताना याचा प्रभाव गौतम अदानी यांच्या संपत्तीवरही दिसत आहे. शेअर्समधील सकारात्मक वाढीमुळे अदानी आता जगातील श्रीमंतांच्या यादीतही वरच्या दिशेने वाटचाल करत आहेत. गौतम अदानी केवळ तीन दिवसात त्यांनी ३७व्या क्रमांकावरून २६व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

अलीकडेच अमेरिकन कंपनी GQG पार्टनर्सने अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांचे १७ कोटीहून अधिक शेअर्स खरेदी केले असून यासाठी कंपनीने १५ हजार ४४९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली, ही बातमी समोर आल्यावर अदानींच्या शेअर्सनी तेजीने व्यवहारास सुरुवात केली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---