---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

मंत्री अनिल पाटलांबाबत शरद पवारांचा खळबळजनक दावा, म्हणाले..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२३ । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत काही आमदार गेले आहेत. यात समावेश असलेले मंत्री अनिल पाटील यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Shara Pawar) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) हे पुन्हा निवडून येणार नाहीत, याची काळजी घेऊ”,असा दावा शरद पवारांनी केल्या असून यामुळे अजित पवार गटात खळबळ उडाली आहे.

sharad pawar anil patil jpg webp

दरम्यान, हिवाळी अधिवेशनानंतर अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकत्र आलेले दिसतील असे विधान मंत्री अनिल पाटील यांनी केले होते. त्यावर बोलताना शरद पवारांनी हा मोठा दावा केला.

---Advertisement---

शरद पवार म्हणाले की, “मी हे सांगू इच्छितो, त्यांच्या मतदारसंघात ( अमळनेर ) मी जाऊन आलो. पुढच्या विधानसभेला मंत्री अनिल पाटील हे निवडून आलेले दिसणार नाहीत. त्याची आम्ही काळजी घेऊ,” असा सूचक इशारा शरद पवारांनी अनिल पाटलांना दिला आहे.

यावेळी शरद पवारांनी अजित पवारांच्या भेटीवरही भाष्य केलं. शरद पवार म्हणाले, “राजकीय जीवन आणि व्यक्तिगत जीवन वेगळे आहे. आमच्या घराची पद्धत आहे, कुठेही असलो तरी, दिवाळीत एकत्र येतो”

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---