---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

मोठी बातमी! शरद पवारांचा जळगाव दौरा रद्द, कारण काय?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२३ । शिवसेनेनंतर आता अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहे. त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) राज्यव्यापी दौरा करणार होते. त्यानुसार ते जळगाव आणि धुळे जिल्ह्यात येणार होते. मात्र त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

sharad pawar 5 jpg webp webp

पावसाळी वातावरणामुळे सध्या कुठलाही दौरा करणार नाहीत. मात्र शरद पवार उद्याची येवल्याची सभा घेणार आहे. येवला येथील सभेनंतर उर्वरित दौरे शरद पवार आठ दिवसांनी करणार आहेत. पावसाळी वातावरणामुळे पवारांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय.

---Advertisement---

उद्या येवल्यातील सभेनंतर पवार धुळे आणि जळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र ते येवल्याहून मुंबईला परतणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आठ दिवसांनंतर ते धुळे आणि जळगाव दौऱ्यावर निघणार आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---