यावलमधील ‘त्या’ बालकावर लैगिक अत्याचार; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक प्रकार उघड

सप्टेंबर 10, 2025 7:34 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२५ । यावल शहरातील बाबुजीपूरा भागातील मोहंमद हन्नान खान या पाच वर्षीय बालकाची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं खळबळ उडाली असून याबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बालकाची हत्या करण्यापूर्वी त्याच्यावर लैगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले आहे. त्यामुळे मारेकरी २२ वर्षीय तरुणाविरुद्ध बालकाच्या लैंगिक अत्याचाराच्या कलमाची वाढ केली आहे.

crime 2 jpg webp

बाबुजीपूरा भागातील पाच वर्षीय बालक मोहंमद हन्नान खान हा शुक्रवारी (दि.५) बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह शेजारी राहणाऱ्या शेख शाहीद शेख बिस्मिल्ला या तरुणाच्या घरात आढळून आला होता. या तरुणाच्या वडीलांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर संबंधित तरुणाची घटनेची कबुली दिली. त्याने मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह जाळला. तो एका गोणीत लपवला होता. त्याची विल्हेवाट लावण्यापूर्वीच घटना उघडकीस आली.

Advertisements

लैंगिक अत्याचारातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला होता. तो खरा ठरला. शवविच्छेदन अहवालातही हेच कारण नमूद करण्यात आले आहे. नुकताच पोलिसांना हा अहवाल प्राप्त झाला आहे. संबंधित तरुणाच्या घरी घटना उघडकीस आली तेव्हाच पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्याचे कलम लावण्यात आले होते. आता बालकाच्या लैंगिक अत्याचारपासून संरक्षण कायदा पोक्सो अन्वये कलमाची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीला १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले आहेत. तपास डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now