---Advertisement---
गुन्हे

कुंटनखाना : भुसावळ तालुक्यात हॉटेलवर छापा, तीन तरुणींची सुटका

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२३ । भुसावळ तालुक्यातील कुऱ्हेपानाचे येथील हॉटेल राजवाडा मध्ये पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. या कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली असून यात परप्रांतीय तीन तरूणींची सुटका करुन त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sex racket jpg webp webp

भुसावळ तालुक्यातील कुऱ्हेपानाचे येथील राजवाडा हॉटेल व लॉजिंगवर देहविक्रीचा धंदा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून देहविक्री करणाऱ्या तिन्ही परप्रांतीय तरुणींची सुटका केली. तसेच त्यांना महिला सुधार गृहात हलविण्यात आले आहे.

---Advertisement---

दरम्यान, या कारवाईत हॉटेल मॅनेजर पंडीत टोंगळे रा. कुऱ्हे पानाचे व मालक संभाजी एकनाथ पाटील रा. जामनेर हे स्वतःच्या फायद्याकरीता पिडीत महिलांना हॉटेलमध्ये बोलवून पैशांचे प्रलोभन देऊन देह व्यापार करण्यास प्रवृत्त करीत असल्याचे निष्पन्न झाले. महिला पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेल मॅनेजर आणि मालक आणि सुरेश बारकू सोनवणे या तीन जणांविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई :

पोलीस अधीक्षक डॉ. एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे, परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सतिष कुलकर्णी, वाहतूक शाखेच्या सहाय्यक फौजदार रुपाली चव्हाण, हवालदार प्रदिप पाटील, अनिल झुंझारराव यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक सतिष कुळकर्णी करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---