---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा जळगाव शहर

खळबळजनक : जळगावात मोलकरणीवर घरात घुसून अत्याचार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२२ । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक प्रकार घडला आहे. घरकाम करीत असलेल्या मोलकरणीला जबदरस्तीने पकडत धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. पीडीत महिलेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

rape jpg webp

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक महिला घरकाम, धुणी, भांडी करण्याचे काम करते. दि.१३ रोजी ती घरात फरशी पुसत असताना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास प्रकाश पुंडलिक पाटील रा.पहूर, ता.जामनेर याने याने पीडीत महिलेला मागून पकडले. महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता तोंड दाबून धमकी देत त्याने महिलेवर अत्याचार केला. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत कुणालाही सांगितल्यास महिलेसह मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

---Advertisement---

पीडित महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---