जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२४ । रोजच्या आपल्या 99 टक्के अण्णपदार्थांमध्ये तेल वापरलं जातं.हे तेल वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं आणि स्वयंपाक करण्याच्या पद्धतीनुसार निवडलं जातं. पण तुम्हाला माहित आहे का, स्वयंपाकाचं तेल सुद्धा कर्करोगाचं कारण ठरू शकतं. अलीकडे अमेरिकेतील एका संशोधनातून आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे; ज्यामध्ये सूचित केले गेले आहे की काही प्रकारच्या खाद्य तेलांमुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
अमेरिकन सरकारद्वारे करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, खायच्या तेलामुळे तुम्हाला कॅन्सरचा धोका होऊ शकतो. हा धोका खासकरून तरूणांमध्ये असतो. हा रिसर्च मेडिकल जर्नल गटमध्ये प्रकाशित झाला आहे.
ज्यात नमूद केले आहे की सूर्यफूल, द्राक्षातील बियाणं, कॅनोला आणि मक्केच्या बियाण्यांच्या तेलाचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो. या संशोधनात कोलन कॅन्सरने ग्रस्त असलेल्या 80 रुग्णांवर अध्ययन केले गेले ज्यामध्ये त्यांच्यामध्ये बायोएक्टिव्ह लिपिड्सचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले.
बायोएक्टिव्ह लिपिड्स हे बियाणांच्या तेलाचं विघटन केल्यानंतर तयार होतात. 30 ते 85 वर्ष वयोगटातील लोकांचे 81 ट्यूमरचे नमुने तपासण्यात आले, ज्यामध्ये त्यांच्या कर्करोगाच्या ट्यूमरमध्ये लिपिडचं प्रमाण अधिक असण्याचं कारण बियांचं तेलच असल्याचं म्हटलं जातो.
बियांचं तेल आणि कर्करोग यांच्यातील संबंध काय?
बियांच्या तेलाचे आरोग्यावर हानिकारक परिणाम होत असल्याचं यापूर्वी झालेल्या अनेक संशोधनात समोर आलं आहे. हे तेल वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं आणि स्वयंपाक करण्याच्या पद्धतीनुसार निवडलं जातं. रोजच्या 99 टक्के अण्णपदार्थांमध्ये तेल वापरलं जातं, परंतु या तेलांच्या वापरामुळे शरीरात हानिकारक लिपिड्स तयार होतात जे कर्करोगासारख्या गंभीर आजारांना चालना देऊ शकतात. विशेषतः तरुणांना याचा धोका जास्त आहे असं या अभ्यासात नमूद केले गेले आहे.