जळगाव शहरात या दिवशी कलम १६३ लागू ; कारण काय?

जानेवारी 1, 2026 3:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परिक्षा-2025 रविवार दिनांक 04 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत जळगाव शहरातील एकूण 23 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. तर गट–क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा–२०२५ रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत जळगाव शहरातील एकूण १४ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परिक्षा कालावधीत परिक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे.

act163

या दोन्ही परीक्षेच्या कालावधीत परीक्षा केंद्रांवर कोणतेही गैरप्रकार घडू नयेत तसेच कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

Advertisements

या आदेशानुसार, परीक्षा सुरू झाल्यापासून ते परीक्षा संपेपर्यंतच्या कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र, परीक्षार्थी, नियुक्त अधिकारी-कर्मचारी, पोलीस व होमगार्ड यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

Advertisements

तसेच, सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा आदेश “कॉपीमुक्त अभियान” यशस्वीरीत्या राबविण्याच्या दृष्टीने काढण्यात आला असून, सर्व संबंधितांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now