जळगाव जिल्हा हादरला ! 10वीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाचा लैंगिक अत्याचार, संशियत नराधम अटकेत

ऑगस्ट 23, 2025 10:52 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२५ । एकीकडे महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नसून अशातच जळगावच्या पाचोरा तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. ज्यात दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकानेच शेतात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घडली. अत्याचाराची ही घटना उघडकीस येताच संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून याप्रकरणी अबिद हुसेन शेख जलील (३८, रा. शेंदुर्णी, ता. जामनेर) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 1 jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावातील काही पीडित विद्यार्थिनीसह काही विद्यार्थी शिक्षणासाठी शेंदुर्णी (ता. जामनेर) येथे स्कूल बसने ये-जा करतात. आरोपी आबिद हा देखील याच शाळेत स्कूल बस चालक म्हणून काम करतो. आरोपीनं पीडित मुलीला एका शेतात घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे.

Advertisements

खरं तर दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पीडितेचा जबाब घेतला असता हा केवळ विनयभंग नव्हे तर लैंगिक अत्याचाराचं प्रकरण असल्याचं समोर आलं. पुरवणी जबाबात पीडितेनं बस चालकाने आपल्यावर बलात्कार केल्याचा जबाब दिला. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित 38 वर्षीय बस चालक अबिद हुसेन शेख जलील याला अटक केली. त्याच्याविरुद्ध बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now