⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | राष्ट्रीय | केंद्रातील मोदी सरकारला हादरवून सोडणारी बातमी ; काय आहे वाचा

केंद्रातील मोदी सरकारला हादरवून सोडणारी बातमी ; काय आहे वाचा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२३ । पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. मात्र दुसरीकडे केंद्र सरकार विविध प्रकल्पांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं कॅगच्या अहवालातून उघड झालं आहे. केंद्रातील सात योजनांमध्ये मोठा घोटाळा झाला असून कॅगच्या अहवालात या योजनांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

कोणत्या योजनांमध्ये झाला घोटाळा ;
भारतमाला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, आयुष्यमान भारत, पेन्शन योजना, द्वारका महामार्ग, अयोध्या विकास प्रकल्प आदी सात योजनांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे ताशेरे कॅगने ओढले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

तसेच रस्ते बांधकाम खर्चात तर कित्येक पटीने वाढ झाल्याचं कॅगच्या अहवालातून समोर आलं आहे. रस्त्याचा खर्च प्रतिकिलोमीटर १८ कोटींवरून सुमारे २५० कोटींवर दाखवला गेला आहे. त्यामुळे विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. आम आदमी पार्टीने तर हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचं म्हटलं आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.