जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२१ । सावदा येथील बहुचर्चित सावदा मर्चेंट पतसंस्थेच्या रिक्त असलेल्या 4 जागा साठी निवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत यात सर्व साधारण 2 ,भटक्या जातीजमती 1 ,इतर मागासवर्गीय 1 या जागांचा समावेश आहे या जागा रिक्त राहिल्या होत्या
सदर रिक्त जागां बाबत कोणती कार्यवाही करावी यासाठी मार्गदर्शन मागविण्यात आले होते त्याअनुषंगाने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण माहाराष्ट्र राज्य पुणे यांनी माहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 अ अ अ (5) मधील तरतूदी अन्वये निवडणुकी व्दारे भरणे अनिवार्य असल्याने सदर बाबत त्वरीत कार्यवाही करावी, तसेच निवडणुकी दरम्यान रिक्त रहिलेल्या जागा पैकी राखीव जागा रिक्त रहिलेल्या असतीलतर सदर राखीव जागा नॉमिनेशन भरण्या बाबत तरतूद असल्याने उचीत कार्यवाही करावी असे सूचित करण्यात आले असून, अश्या निवडणुकी साठी निवडणूक नियमातील तरतूदी जश्याच्या तश्या लागू असल्याने कोणत्याही मार्गदर्शनाची अपेक्षा न करता अश्या रिक्त जागा भरणे बाबत कार्यवाही जिल्हा, प्रभाग, तालुका, सहकारी निवडणूक अधिकारी व निवडणूक अधिकारी यांनी करावी असे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण माहाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिले असून यामुळे सावदा मर्चेंट पतसंस्थेच्या रिक्त असलेल्या 4 जागा साठी निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून संबंधित निवडणूक अधिकारी यांनी येथील रिक्त पदासाठी लवकर निवडणुका घेणे अपेक्षित आहे