सावद्याच्या डॉ. उल्हास पाटील सीबीएसई स्कुलमध्ये प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन उत्साहात
जळगाव लाईव्ह न्यूज । अयोध्या (Ayodhya) येथील प्रभू श्रीराम (Shri Ram) मंदीर प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळा सावद्याच्या डॉ. उल्हास पाटील सीबीएसई (CBSE) स्कुलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.
आपल्या देशात अध्यात्मिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा विविध परंपरा साजरा केल्या जातात आणि म्हणूनच हा देश महान आहे. अयोध्या येथे प्रभु श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळयास दि २२ रोजी एक वर्ष पुर्ण झाले याचपार्श्वभुमीवर सावदयाच्या डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे वर्धापन दिनानिमीत्त पूजा व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या प्रिन्सीपल भारती महाजन यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शिक्षिका दिपाली धांडे यांनी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे महत्त्व विषद केले. प्रभू राम स्तुती आणि इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी व संस्कृत शिक्षिका वर्षा नेहते सर्वांनी राम रक्षा स्तोत्राचे वाचन केले. उद्देश एकच की विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिक मूल्य रुजले जावे. प्रिन्सीपल भारती महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. अध्यात्मिक वातावरणात हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.