राष्ट्रवादीकडून निवडणूक प्रभारींची यादी जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२५ । राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारांनी मोठा डाव टाकला असून राष्ट्रवादीकडून निवडणूक प्रभारींची यादी जाहीर करण्यात आलीय. यात भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांच्यावरही महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांना प्रभारींच्या यादीत स्थान देण्यात आले नाहीय.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिका निवडणुकींच्या तोंडावर नेत्यांवर मोठी जबाबदारी दिली आहे. २९ महानगरपालिकेत निवडणूक प्रभारींची नेमणूक केली आहे. मुंबईची जबाबदारी रोहित पवार तर पुण्याची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवली आहे.

दरम्यान, भुसावळ नगरपालिकेवर राष्ट्रवादीने झेंडा फडकविला आहे. राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गायत्री भंगाळे यांनी मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव केला आहे. यामुळे भुसावळात राष्ट्रवादीचा विश्वास वाढला आहे. अशातच राष्ट्रवादीकडून निवडणूक प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात संतोष चौधरी यांच्यावरही महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे एकनाथ खडसे यांना या यादीत स्थान देण्यात आले नाहीय.
निवडणूक प्रभारींची यादी
बृहन्मुंबई – आमदार रोहितदादा पवार
ठाणे – आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड
नवी मुंबई – आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश अध्यक्ष
उल्हासनगर – आमदार .डॉ. जितेंद्र आव्हाड
कल्याण डोंबिवली – खासदार बाळयामामा म्हात्रे
भिवंडी निजामपूर – . खासदार बाळयामामा म्हात्रे
मीरा भाईंदर – आमदार .डॉ. जितेंद्र आव्हाड
नाशिक – सुनिल भुसारा
मालेगाव – खासदार भास्कर भगरे
अहिल्यानगर – खासदार निलेश लंके
जळगाव – संतोष चौधरी
धुळे – प्राजक्त तनपुरे
पुणे – खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय कार्याध्यक्षा
पिंपरी चिंचवड – खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार
सोलापूर – खासदार धैर्यशील पाटील
कोल्हापूर – हर्षवर्धन पाटील
इचलकरंजी – बाळासाहेब पाटील
सांगली – मिरज – कुपवाड – आमदार जयंत पाटील
छत्रपती संभाजीनगर – खासदार बजरंग सोनवणे
नांदेड-वाघाळा – जयप्रकाश दांडेगावकर
परभणी – फौजिया खान
जालना – राजेश टोपे
लातूर – विनायक जाधव पाटील
अमरावती – रमेश बंग
अकोला – डॉ. राजेंद्र शिंगणे
नागपूर – अनिल देशमुख
चंद्रपूर – खासदार अमर काळे





