Samaj Kalyan Vibhag Bharti : राज्य सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. समाज कल्याण विभाग पुणे येथे मोठी पदभरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजेच या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून दहावी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी त्वरित अर्ज करावा. अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.
या पदांसाठी होणार भरती?
1) उच्चश्रेणी लघुलेखक 10
2) गृहपाल/अधीक्षक (महिला) 92
3) गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) 61
4) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 05
5) निम्नश्रेणी लघुलेखक 03
6) समाज कल्याण निरीक्षक 39
7) लघुटंकलेखक 09
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
किती फी भरावी लागेल?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुला प्रवर्गातील उमेदवारांना ₹1000 रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 900 परीक्षा शुल्क भरावी लागेल,
तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पुणे/महाराष्ट्र
Notification : PDF
Onlain अर्ज : Apply Online