⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | वाणिज्य | सततच्या धमक्यांमुळे सलमान खानने केली नवी बुलेटप्रूफ कार खरेदी, किंमत ऐकून व्हाल चकित..

सततच्या धमक्यांमुळे सलमान खानने केली नवी बुलेटप्रूफ कार खरेदी, किंमत ऐकून व्हाल चकित..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२३ । बॉलिवूडचा दबंग म्हणजेच सलमान खानला (गेल्या अनेक दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अलीकडेच त्याला धमकीचा ईमेलही आला होता. या ईमेलनंतर पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ केली होती. मात्र, सततच्या धमक्यांमुळे आता सलमान खानने मोठा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने एक नवीन बुलेटप्रूफ निसान पेट्रोल एसयूव्ही (Nissan Patrol SUV) ही कार खरेदी केली आहे. बुलेटप्रूफ असल्याने या कारची किंमतही खूपच जास्त आहे. ती ऐकून तुम्हीही चकित व्हाल.. सध्या या महागड्या आणि आलिशान गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

विशेष म्हणजे हे वाहन आतापर्यंत भारतात लॉन्च झालेले नाही. सलमान खानने निसान पेट्रोल एसयूव्ही आयात केली आहे. या कारची गणना सर्वात महागड्या एसयूव्हीमध्ये केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही कार अतिशय खास असल्याचे बोलले जात आहे. 18 मार्च रोजी सलमान खानला धमकीचा ईमेल आला होता. त्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा उल्लेख केला जात आहे.

मात्र, सततच्या धमक्यांमुळे आता सलमान बुलेटप्रूफ निसान पेट्रोल एसयूव्ही ही कार खरेदी केली आहे. सलमान खानने खरेदी केलेली बुलेटप्रूफ कार ही पांढऱ्या रंगाची असून खूपच स्टायलिश आहे. एका जपानी कंपनीने या गाडीची निर्मिती केलेली आहे.

किती आहे किंमत?
सलमान खानने खरेदी केलेल्या निसान पेट्रोलमध्ये ५.६-लिटर व्ही ८ पेट्रोल इंजिन आहे. एसयूव्हीचे इंजिन ७-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या कारची बाजारातील किंमत ८० लाख आहे.पण सलमान खानने आयात केलेली कार बुलेटप्रूफ आणि चिलखती आहे, त्यामुळे तिची किंमत करोडोंमध्ये आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.