---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

खळबळजनक ! सावद्यात डोक्यात दगड घालून सालदाराचा खून

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२४ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नसून अशातच एक खळबळजनक घटना रावेर तालुक्यातील सावदा येथून समोर आली आहे. शेतात सालदार म्हणून काम करणार्‍या प्रौढाचा डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शोभाराम रिचू बारेला ( वय ४५) असं हत्या झालेल्या प्रौढाचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

murder raver

याबाबत असे की, सावदा ते कोचूर रोडच्या दरम्यान असलेल्या शेतात शोभाराम रिचू बारेला ( वय ४५) हा व्यक्त सालदार म्हणून काम करतो. तो शेतात बांधलेल्या खोलीतच वास्तव्यास होता. दरम्यान, आज शनिवारी त्याचा मृतदेह आढळून आला असून डोक्यात दगड घालून त्याला संपविण्यात आल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे.

---Advertisement---

यांनतर सावदा पोलिसांना सूचित करण्यात आले. सावदा सहा.निरीक्षक जालिंदर पळे व सहकार्‍यांनी धाव घेत तपासाला सुरूवात केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला असून नातेवाईकांकडून पोलीस माहिती जाणून घेत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---