पाचोऱ्यातील एका गावामध्ये अजब अफवा; ग्रामस्थांची उडाली झोप, काहींची गाव सोडून डोंगराकडे धाव..

सप्टेंबर 19, 2025 8:50 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२५ । मागच्या काही दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यातून पाचोऱ्यासह जामनेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात अतिवृष्टी झाली. जोरदार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहताना दिसून आले तर या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणे काठोकाठ भरले. दरम्यान, पाचोर्‍याच्या सातगाव डोंगरी परिसरात धरण फुटल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे काही लोकांनी थेट गाव सोडले तर काही लोक डोंगरावर जाऊन बसली होती.

satgaon dongari

पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसामुळे परिस्थिती निर्माण झाली होती. घाटनांद्रा व जोगेश्वरी खोऱ्यातून आलेल्या पुरामुळे स्थानिक ग्रामस्थ आधीच संकटात असताना, आज अचानक सातगाव डोंगरी परिसरात धरण फुटल्याची अफवा पसरली.

Advertisements

या अफवेचा परिणाम असा झाला की परिसरातील ग्रामस्थांनी जीव वाचवण्यासाठी घरं सोडली, काहींनी डोंगरकडे धाव घेतली, तर काही गाव सोडून बाहेर पळाले. या अफवेने संपूर्ण परिसरातील गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र एका जागरूक तरुणाने धाडस करून प्रत्यक्ष धरणावर जाऊन चित्रीकरण केलं आणि कोणतंही धरण फुटलेलं नाही, असे सांगणारा व्हिडिओ व्हायरल केला. त्यामुळे काही तासांनी ग्रामस्थांना दिलासा मिळाला असला, तरी या अफवेने मोठी खळबळ उडवून दिली होती.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now