⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

PM KISAN YOJANA : ६ हजार अपात्र शेकऱ्यांकडून वसूल केले ५ कोटी रुपये

जळगाव लाईव्ह न्युज | PM KISAN YOJANA | आयकर भरत असून सुद्धा प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्याऱ्या जिल्हातील ५ हजार ८४७ अपात्र शेतकऱ्यांकडून जिल्हाप्रशासनाने आतापर्यंत ५ कोटी ५४ लाख २६ हजार रुपयांची रक्कम वसूल केली आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. वसूल रक्कम केंद्र शासनाला परत पाठवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

शेतकऱ्यांनी पीएम-किसान योजनेचा १३ कोटी ६२ लाख ३२ हजार रुपयांचा लाभ घेतला आहे. या शेतकऱ्यांना पीएम-किसानचा पुढील हप्ता मिळण्यास अपात्र ठरवण्यात आले. त्यांनी आतापर्यंत घेतलेली रक्कम वसूल करण्यात येत आहे. हा प्रकार सर्वांत अगोदर अमळनेर तालुक्यात आढळला. नंतर सर्वच तालुक्यांत असे प्रकार आढळले. सर्वच तहसीलदारांनी इन्कम टॅक्स भरणाऱ्या ५ हजार ८४७ अपात्र शेतकऱ्यांकडून वसुली करण्यात आली आहे.

वसूल करण्यात आलेली रक्कम


अमळनेर– ३५ लाख ७८ हजार
चोपडा– २२ लाख १८ हजार
पाचोरा– ४५ लाख ४८ हजार
भडगाव– २८ लाख ३४ हजार
चाळीसगाव– ५३ लाख ५० हजार
जळगाव– ५८ लाख ०० हजार
जामनेर–६० लाख ५३ हजार
एरंडोल– २१ लाख ६६ हजार
धरणगाव– ३८ लाख ६२ हजार
पारोळा- ३२ लाख ६२ हजार
भुसावळ– २५ लाख ९६ हजार
बोदवड– १३ लाख २ हजार
मुक्ताईनगर– ७ लाख ५४ हजार
यावल– ५२ लाख २० हजार
रावेर– ५८ लाख ८४ हजार