⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा, एकनाथ खडसे म्हणतात..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२२ । पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस असून मागील गेले चार दिवस विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. मात्र आज सत्ताधारी आमदारांकडून देखील घोषणाबाजी सुरू करण्यात आली. लवासातील खोके सिल्वह ओक ओक्के, वाझेचे खोक्के मातोश्री ओक्के अशा घोषणा देण्यात आल्या. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याने जोरदार राडा झाल्याचे पहायला मिळाले.

या सर्व राड्यामध्ये आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यामध्ये चांगलीच जुंपली नंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं देखील पहायला मिळालं. यावर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले खडसे?
विचारांची लढाई विचारांनीच लढली गेली पाहिजे. अधिवेशन काळात विधानभवनाच्या सर्व कोड ऑफ कंडक्टचे पालन झाले पाहिजे. तत्वाची लढाई तत्वाने लढावी. असं एकोमेंकांच्या अंगावर जाणे किंवा हात उगारणे योग्य नाही. निषेध किंवा आंदोलन हे शांततेच्या मार्गाने व्हाव, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.