जळगाव लाईव्ह न्यूज । श्रीराम माध्यमिक विद्यालयात २० डिसेंबर रोजी रोटरी क्लब तर्फे 7 7 7 प्रोजेक्ट अंतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अक्षरलेखन व सुंदर हस्ताक्षर सुधारण्यासाठी कॅलिग्राफी अक्षरलेखन कृती सत्राचे आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयातील मुख्याध्यापक दिवाकर जोशी होते तर प्रमुख अतिथी रोटरी क्लबचे समन्वयक सुबोध सराफ हे होते. याप्रसंगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व रोटली क्लबचे समन्वयक सुबोधजी सराफ यांनी विद्यार्थ्यांना कॅलिग्राफी अक्षरलेखन कसं करावं व सुंदर हस्ताक्षर कसे काढावे याविषयी कृती सत्र घेतले व यात प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले या कृती सत्रामध्ये विद्यालयातील एकूण 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व सुंदर हस्ताक्षर सुधारण्यासाठी कॅलिग्राफी अक्षरलेखन कसं करावं सुंदर अक्षर कसं काढावं प्रत्यक्ष कृती द्वारा सुबोधजी सराफ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या शंका निरसन केले.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिवाकर जोशी सर यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात सुंदर अक्षराचे फायदे या विषयी माहिती दिली तसेच आजच्या कॅलिग्राफी अक्षर लेखन कृती सत्राचा विद्यालयातील विद्यार्थ्यांना फायदा होईल व त्यांच्या अक्षर लेखनामध्ये सुधारणा होईल असे सांगितले. कॅलिग्राफी अक्षरलेखन सुंदर अक्षर कृती सत्र आयोजनाचे संपूर्ण नियोजन रोटरी क्लब अंतर्गत इंटरॅक्ट क्लबचे समन्वयक दिनेश पाटील सर व सौ प्रतिभा पाटील यांनी केले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक दिनेश पाटील यांनी केले. तर आभार सौ. प्रतिभा पाटील यांनी मानले. कृती सत्राच्या आयोजनासाठी अनमोल असे सहकार्य संनो पिंजारी, राजश्री तायडे, किरण पाटील, अमीत तडवी यांनी केले. कृती सत्र आयोजनाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले.





