⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | अधिवेशनात वेगवेगळ्या घोषणा, योजना जाहीर होतील, पण…; रोहिणी खडसेंनी सरकारवर निशाणा साधला

अधिवेशनात वेगवेगळ्या घोषणा, योजना जाहीर होतील, पण…; रोहिणी खडसेंनी सरकारवर निशाणा साधला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२४ । राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आज २७ पासून सुरु झाले असून या अधिवेशनावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला सेलच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी भाष्य केलं शिंदे सरकारवर टीका केली आहे. अधिवेशनात वेगवेगळ्या घोषणा योजना जाहीर होतील मात्र अंमलात आणल्या जाणार नाही. फक्त लोकांना प्रलोभने दिली जातील, असं म्हणत रोहिणी खडसे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. जळगाव जिल्हा शरद पवारांच्या पाठीशी नेहमी राहिलेला आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा जिंकून येतील, असहा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज पार पडली. या बैठकीतील मुद्द्यांवरही रोहिणी खडसे यांनी भाष्य केलंय. महायुतीचे सरकारचे शेवटचा अधिवेशन आहे त्यामुळे या अधिवेशनामध्ये वेगळी प्रलोभन दिली जातील. वेगवेगळ्या घोषणा केल्या जातील. वेगवेगळे योजना या माध्यमातून जाहीर करण्याचा प्रयत्न करेल. कारण हे शेवटचे अधिवेशन आहे. घोषणा अंमलात आणला जाणार नाहीत. मात्र शेवटचा अधिवेशन असल्यामुळे लोकांना प्रलोभन देण्याचे काम केलं जाईल. अधिवेशनाचा उपयोग केवळ मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकार करेल असं मला वाटतं, असं रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत.

तर रणनीती आणि नियोजन जर तुम्हाला आताच सांगितलं तर आम्हाला निवडून यायला अडचणी होतील, असं म्हणत विधानसभेच्या रणनितीच्या प्रश्नावर रोहिणी खडसे म्हणाल्या. भविष्यात विधानसभा निवडणुकांना कशा पद्धतीने सामोरे जायचं या पद्धतीने बैठकीत चर्चा झाली. लोकसभेच्या दोन्ही जागा आम्ही असलेलो आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नकारात्मकतेची भावना पसरली आहे. ती दूर करण्याबाबत हे बैठकीत चर्चा झाली, असं रोहिणी म्हणाल्या.

जळगाव जिल्हा शरद पवारांच्या पाठीशी नेहमी राहिलेला आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा जिंकून येतील. आमच्या उमेदवारांना मत कमी पडली ती मतं का कमी पडली याचा प्रत्येकाने अभ्यास केला आहे ..मार्ग काढणं आणि त्या दृष्टीने विधानसभा निवडणुकीमध्ये सामोरे जायचे या विषयावर बैठक झाली, असं म्हणत रोहिणी खडसे यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.