⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | ब्रेकिंग ! रोहिणी खडसेंच्या भाषणादरम्यान शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न..

ब्रेकिंग ! रोहिणी खडसेंच्या भाषणादरम्यान शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२३ । शेतकऱ्यांच्या (Farmer) विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे (NCP) जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताईनगर (Muktainagar) येथे आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान, रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे भाषण सुरू असतानाच एका शेतकऱ्याने पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे एकच गोंधळ उडाला.

कापसाला १५ हजार प्रती क्विंटल भाव मिळावा, केळी पिक विम्यातील जटिल अटी रद्द कराव्या, केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे , अशा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादीकडून मुक्ताईनगर येथे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. गोदावरी मंगल कार्यालय येथुन मोर्चाची सुरुवात करण्यात येऊन तहसील कार्यालय येथे मोर्चाची सांगता करण्यात आली.

मोर्चात केळीचे खोड, कांद्याच्या माळा, कापूस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे लावून बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. त्या लक्ष वेधून घेत होत्या. अजय तळेले यांनी सादर केलेला कुंभाकर्णाचा सजीव देखावा लक्ष वेधून घेत होता. यावेळी हजारो कार्यकर्ते व शेतकरी बांधव सरकार विरोधी घोषणा देत मोर्चात सहभागी झाले होते. यातून शेतकऱ्यांचा शासनाप्रती असलेला आक्रोश दिसून येत होता.

यादरम्यान, सभेचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी रोहिणी खडसे यांनी आपल्या भाषणादरम्यान मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला. गॅस दरवाढीवरूनही हल्लाबोल केला. मात्र त्यांचे भाषण सुरु असताना एका शेतकऱ्याने पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थिती कार्यकर्त्यांनी वेळीस शेतकऱ्याच्या हातून पेट्रोलची कॅन हिसकावली आणि पुढील अनर्थ टळला. मात्र या प्रकारामुळे सभेत एकच गोंधळ उडाला होता.

दरम्यान, या शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न का केला? याबाबत कळू शकले नाही.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.