---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

केंद्रीय मंत्री पियूष गोएलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहिणी खडसे संतापल्या; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२५ । काश्मीर मधील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट आहे. विविध स्तरावरून या घटनेचा निषेध केला जात असून यातच केंद्रीय मंत्री पियूष गोएल यांनी एक व्यक्तव्य केला आहे. जोपर्यंत देशातील 140 कोटी नागरिक देशभक्ती आणि राष्ट्रवादाला आपला धर्म मानता नाही, तोपर्यंत अशा गोष्टी (पहलगाम हल्ला) होत राहतील, असे वक्तव्य पियूष गोएल यांनी केले. दरम्यान त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी एक्सवर पोस्ट करत चांगलाच समाचार घेतला आहे.

rohini khadse piyush goyal

काय म्हटलं रोहिणी खडसेंनी?
रोहिणी खडसे त्यांनी म्हटलंय की, केंद्रीय मंत्री पियूष गोएल म्हणतात की, जनतेच्या चुकीमुळे हल्ला झाला. हल्ला झाला तिथे सुरक्षा यंत्रणा का नव्हती? सरकारची गुप्तचर यंत्रणा काय करत होती? गेली 10 वर्षे संपूर्ण बहुमताचे सरकार असून सत्ताधारी दहशतवाद का संपवू शकले नाही? या प्रश्नांचे उत्तर तर मिळालेच नाही. उलट आता केंद्रीय मंत्री सामान्य जनतेवर खापर फोडत आहे, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केलाय.

---Advertisement---


तर रोहिणी खडसे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. केंद्रीय मंत्र्यांचे विधान अत्यंत बेजबाबदार आणि असंवेदनशील आहे. खरंतर यांचा राजीनामाच घ्यायला हवा, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment