⁠ 
सोमवार, मे 27, 2024

अर्चना पाटीलांचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत रोहिणी खडसेंनी साधला निशाणा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२४ । भाजप आमदार राणाजगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी नुकतंच भाजपमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी अर्चना पाटील या धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असतील, अशी घोषणा केली.पण उमेदवारी घोषित झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत अर्चना पाटील या वादात सापडल्या आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. माझा नवराच भाजपचे आमदार आहेत. मी कशाला राष्ट्रवादी वाढवू? असं ते पत्रकारांना प्रतिक्रिया देताना म्हणत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी ट्विट करत टीका केली

अर्चना पाटील या धाराशिव मतदारसंघात प्रचारासाठी फिरत आहे. या दरम्यान पत्रकारांनी त्यांना बार्शीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फारसं वर्चस्व नाही. फक्त आमदार रांजेद्र राऊत आहेत. त्यांचाच इथे गट आहेत. तुम्ही राष्ट्रवादी वाढवणार आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरावरुन विरोधकांकडून टीका केली जात आहे.

रोहिणी खडसे यांनी संबंधित व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधला आहे. “टिक टिक वाजते डोक्यात, धड धड वाढते ठोक्यात… फक्त कमळच आहे डोक्यात, घड्याळ आहे उसनवारीत..!”, असं ट्विट रोहिणी खडसेंनी केलं आहे.