⁠ 
सोमवार, जानेवारी 6, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोलपंपावर दरोडा ; अमळनेर जवळील थरार घटना

बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोलपंपावर दरोडा ; अमळनेर जवळील थरार घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२३ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत असून त्यातच आता लुटमारीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमळनेरनजीक डांगर शिवारातील पेट्रोलपंपावर एकाने बंदुकीचा धाक दाखवून ३६ हजार रुपये लुटून नेल्याची थरार घटना गुरुवारी रात्री घडलीय. त्याचवेळी त्याचा साथीदार मोटरसायकल घेऊन आला. दोघे मोटरसायकलने धुळ्याकडे पसार झाले. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नेमकी काय आहे घटना?
डांगर शिवारातील पांडुरंग पेट्रोलपंपावर गुरुवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास काळ्या रंगाच्या रुमालाने चेहरा बांधलेला एक जण आला. त्याने पंपावरील कर्मचाऱ्यांना झोपेतून उठविले. त्याच्याकडील बंदुकीचा धाक दाखवत पेट्रोल- डिझेल विक्रीचे पैसे हिसकावून घेतले. त्याचवेळी एक जण चारचाकी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी पंपावर आला. या लुटारूने त्याच्या त्या वाहनाच्या डीकीला लाथा मारून चालकास बाहेर निघण्यास भाग पाडले. त्यालाही बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली व त्याच्याजवळ असलेले पाकीट हिसकावून तो अमळनेर रस्त्याकडे गेला. त्याचवेळी त्याचा साथीदार मोटरसायकल घेऊन आला. दोघे मोटरसायकलने धुळ्याकडे पसार झाले.

पेट्रोलपंपावरील कर्मचारी नरेंद्र सोनसिंग पवार याच्याकडून १३ हजार, किशोर रवींद्र पाटील याच्याकडून १४ हजार व डिझेल टाकण्यासाठी आलेल्या संजय दिलीप भामरे याच्याकडून नऊ हजार रुपये असा एकूण ३६ हजार ५०० रुपये या चोरट्याने हिसकावून नेले. घटनास्थळी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी भेट दिली. तपासासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करण्यात आली आहे. याबाबत नरेंद्र सोनसिंग पवार (रा. रणाइचे, ता. अमळनेर) याने अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.